नवीन वर्षाचा पहिला महिना जवळजवळ संपत आला. नवीन वर्षाचे नवे संकल्प या पहिल्या महिन्याच्या शेवटापर्यंत हळूहळू विरघळत जातात.
काही दिवसांपूर्वी मीसुद्धा विचार करत होते की या वर्षाचं काय resolution करावं !! रोज ट्रेडमिलवर पळेन, meditate करेन.... काही नक्की होत नव्हतं आणि मग एकदम सुचलं किंवा खूप दिवसांपासून जे मनात होतं ते अचानक उसळून वर आलं की येस्स या वर्षी मी declutter करेन! लगेच डोळ्यांसमोर भरलेली कपाटं , अस्ताव्यस्त माळा, गॅरेज अडगळीचा कोपरा आला ना? पण मी म्हणतेय ते clutter घरातलं नाहीच. ते आहे माझ्या मनातलं .
मला जमेल का? मी करू शकेन का ? खरंच करायची काही गरज आहे का? माझ्या करण्याची कोणी दखल तरी घेणार आहे का ? त्याचा काही उपयोग तरी आहे का? आज नको, उद्यापासून.... हे आणि असले सगळे जे विचार माझ्या मनात येतात ना हेच माझं clutter !
मी आजूबाजूला बघते तेव्हा सगळ्यांना घाई असते. सगळे पळत असतात. सगळे अशा अजब रेसमध्ये पळत असतात ज्याची कुठे फिनिशिंग लाईनच नसते. तर या वर्षी मी ठरवलंय की at least या वर्षी आणि जमलं तर फॉरेव्हर या जगाच्या रेसकडे पाठ फिरवून माझ्या मनाला आवडेल त्या दिशेने जायचं. माझी दिशाच वेगळी असल्यामुळे स्टॅन्डर्ड रेसमध्ये धावल्यावर टप्याटप्यांवर जे incentive मिळतात जसं पैसा, प्रतिष्ठा etc ते कदाचित नाही मिळणार पण स्वतःला शोधल्याचा आनंद तर मिळेल. माझ्या मनाचं जर मीच ऐकत नसेन, तर दुसरं कोणी ऐकेल अशी अपेक्षा तरी कशी करावी! "म्हणजे काय मनमानी करायची ठरवलीये वाटतं!" असा खोचक प्रश्न नाही ना आला तुमच्या मनात? तर तसं नव्हे. ज्या नात्यांच्या परीघात मी आहे, ती कर्म करणं तर माझं कर्तव्यच आहे , ती करायलाच हवीत पण त्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आपण आपण उगाचच वाढवतो त्यात आपली खूप एनर्जी वाया जातेय असं वाटतंय. जसं कोणत्याही घड्याळात बघितलं तरी वेळ समजते तरीही ब्रँडेड घड्याळ हवंसं वाटतं , मग त्यासाठी जास्त पैसा कमवावा लागतो, वर ते घड्याळ लोकांनी नोटीस करावं , कॉम्पलिमेन्ट्स द्यावी असं वाटायला लागतं . ह्या ज्या सगळ्या वाढीव गरजा आहेत ना त्या सुद्धा clutter च !!
So to summarise, the plan is to find my true self....स्वतःचा शोध घेणार आहे, स्वतःहाची नीट ओळख करून घेणार आहे आणि स्वतःमध्ये उचित असे बदल घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. मनात काही ढोबळ आराखडा आहे पण तो पुढच्या वेळेसाठी ठेऊया . माझ्याकडे तर हे एकच आयुष्य आहे. तुमचा काय प्लॅन?
Aprateem. Mi Tumchi Fan jhale ahe Madhuritai.
ReplyDeleteTumchya lekhanmadhun saglya waachakannahi 'treatment' milte aahe :)
God bless you!
http://mehfil.blogspot.com
प्रज्ञा, आपल्या प्रतिक्रियेकरिता आपले मनापासून धन्यवाद. अशीच ट्रीटमेंट चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.
Delete