झेप (कविता)
पक्ष्यांनी तर उंच उडावे
क्षिती नसावी पडण्याची
अन भीती नसावी आभाळाची
डोळ्यांमधल्या स्वप्नांसाठी
पक्ष्यांनी तर उंच उडावे
पिंजरे सगळे तॊडून टाकून
दाणे पेरू मागे सोडून
नजर लावूनी निळ्या नभांवरी
पक्ष्यांनी तर उंच उडावे
कुणी क्वचित मेघांत हरवतील
इंद्रधनूच्या पारही जातील,
ना जावे तर कसे कळावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे
शोध नव्हे हा आभाळाचा
शोध पंखांतील बळाचा
गंगनभरारी घेताना पक्ष्याने स्वतःला तोलावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे
डॉ. माधुरी ठाकुर
khup chan
ReplyDelete